ऐकावं ते नवलच! Birthday आहे बकरीचा, जल्लोष साऱ्या घराचा; Video Viral
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
मुंबई : आजकाल आपण वेगवेगळ्या गोष्टी ऐकत असतो. बऱ्याचवेळा तर आपला विश्वास बसणार नाही अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असंच काहीतरी झालं आहे. यूपीच्या बांदा येथील एका जोडप्यानं नुकत्याच जन्माला आलेल्या शेळीच्या पिल्लाचा वाढदिवस थाटामाटात साजरा केला आहे. कांशीराम कॉलनीत राहणाऱ्या पती-पत्नीने यावेळी सर्व नातेवाईक आणि मित्रांना बोलावून शेळीच्या पिल्लाचा वाढदिवस साजरा करत केक कापला. इतकंच नाही तर त्यांनी त्या शेळीच्या पिल्लाला लहान मुलासारखं वाढवलं आहे. त्यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी डीजे देखील बूक केला आहे. त्यांनी बकरीच्या पिल्लासोबत फोटो काढत शुभेच्छा केली आहे. (Viral Video)
या पार्टीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रिपोर्ट्सनुसार, या दोघांना अपत्य नाही. तर त्यांनी पाळलेल्या शेळीनं गेल्या वर्षी दोन पिल्लांना जन्म दिला. त्यामुळे त्यांनी यंदाच्या वर्षी गाजाबाजत शेळीचा वाढदिवस सादरा केला. तर त्या व्यक्तीनं सांगितलं की, 'आम्ही प्राण्यांना आमची मुलं मानतो आणि त्यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आम्ही पिल्लांची नावं कुबेर आणि लक्ष्मी ठेवलं आहे आणि मी त्यांना रिक्षानं फिरायला घेऊन जातो. त्यांना लहान मुलाप्रमाणे वागवणारे राजा पुढे म्हणाले की त्यांना आनंद व्हावा म्हणून आम्ही त्यांना फिरायला घेऊन जातो.
पाहा व्हिडीओ -
राजा पुढे म्हणाले, जेव्हा आम्ही आमच्या पाळीव शेळीच्या पिल्लाचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा काही लोकांनी आश्चर्य व्यक्त केले, परंतु आम्हाला आनंद झाला की ते आमच्या मुलांसारखे आहेत. यामुळे आम्ही सगळी व्यवस्था केली. सगळ्यांना छान खायला दिलं होतं. मात्र, वाढदिवसानिमित्त भेटवस्तू आणणारेही काही जण होते. पिल्लांच्या वाढदिवसानिमित्त पाहुण्यांनी भेटवस्तूही आणल्याचे त्यांनी सांगितले. 'आम्ही त्यांच्यासाठी ब्लँकेट आणि इतर भेटवस्तू मिळाल्या,' राजा म्हणाले, त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.