नवी दिल्ली : बिटकॉनइचे व्यवहार करणाऱ्या कंपन्यांवर इनकम टॅक्स विभागाने धाडसत्र सुरू केल्यावर कंपन्यांची बेबसाईटच बंद झाली आहे. त्यामुळे बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केलेल्या अनेकांना फटका बसला आहे. खास करून दिल्ली एनसीआरमधील अनेकांचे कोट्यवधी रूपये अडकल्याचे बोलले जात आहे.


अनेकांना गंडा पोलिसांत तक्रार दाखल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केवळ दिल्ली-एनसीआरच नव्हे तर, उत्तर प्रदेश, बिहारमध्येही अनेकांचे पैसे अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. धक्कादायक असे की, बीटकॉइन खरेदी केलेल्या लोकांचे डिजिटल वॉलेटही ब्लॉक करण्यात आले आहे. या संदर्भात आर्थिक तक्रारींबाबत दिल्ली पोलिसांकडे 15 व्यक्तिंनी तक्रार दिली आहे. आरोप केला जात आहे की, हैदराबाद (आंध्र प्रदेश) येथून चालवली जाणारी वेबसाइट 15 दिवसांपासून बंद आहे. दरम्यान, कंपनीच्या संचालकांनी 24 तासात सर्व काही ठिक होईल असा दावा केल्याचेही वृत्त आहे.


काय म्हणतेय आरबीआय?


दरम्यान, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) इशारा दिला आहे. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणे हे भविष्यासाठी धोकादायक असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. आरबीआयने म्हटले आहे की, 'गेल्या काही काळापासून व्हर्च्युअल करन्सीच्या मूल्यामध्ये अप्रत्यक्षरित्या वाढ आणि इनिशियल कॉईन ऑफरिंग (ICO) यांच्यात मोठी वृद्ध झाली आहे. ही वृद्धी पाहून आम्हाला चिंता वाटते. महत्त्वाचे असे की, बिटकॉईन हा रिझर्व्ह बँक निर्धारीत करत नाही. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून बिटकॉईनचा भाव चांगलाच वधारला आहे. सध्या तो 11,000 डॉलरवर पोहोचला आहे.' 24 डिसेंबर 2013लाही आरबाआयने म्हटले होते की, 'व्हर्च्युअल करन्सीला वास्तवात कोणताही आधार नाही. तसेच, याची बाजारपेठेतील किंमत ही केवळ अंदाज आणि काही ठोकताळ्यांवर अधारीत असते. यापूर्वीही व्हर्च्युअल करन्सीमध्ये अनेक चढ-उतार पहायला मिळाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना आम्ही सतर्कतेचा इशारा देत आहोत', असेही आरबीआयने म्हटले आहे.