अहमदाबाद : गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्याचं मतदानासाठीच्या प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे.


काँग्रस आणि भाजपने लावली संपूर्ण ताकद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्या म्हणजे सात तारखेला संध्याकाळपर्यंत प्रचाराची मुदत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप यांनी दोन्ही बाजूनीं प्रचारासाठी आपली सगळी ताकद गुजरातमध्ये उतरवली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी कालच गुजरातमध्ये दाखल झाले. पण पावसामुळे त्यांना एकच सभा घेता आली. त्यांच्या आजच्या सभा रद्द करण्यात आल्या आहेत.


भाजपचे मोठे नेते मैदानात


पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आज पुन्हा गुजरातमध्ये येत आहेत. मोदींची सुरतमध्ये सभा होते आहे. याशिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, माहिती प्रसारण मंत्री स्मृती इराणी, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज आणि उद्या पहिल्या टप्प्यातल्या मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या रणधुमाळीत उतरत आहेत.


साऱ्या देशाचं लक्ष


साऱ्या देशाचं गुजरात विधानसभा निवडणुकीडे लक्ष लागलं आहे. गुजरात निवडणुकीत कोणी बाजी मारतं यावरुन भारतीय राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे. भाजपला जर या निवडणुकीत धक्का बसला तर याचा थेट परिणाम २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवर होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या राज्यात विजय मिळवणं हे भाजपसाठी अतिशय महत्त्वाचं झालं आहे.


काँग्रेस जर या निवडणुकीत जिंकते तर त्यांच्यासाठी हा पुन्हा एक आशेचा किरण ठरु शकतो. राहुल गांधी स्वत: या निवडणुकीत आपली ताकद लावत आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसला विजय मिळतो का की लोकं त्यांना नाकारतात हे निवडणुकीच्या निकालाच दिसणार आहे.


पाहा व्हिडिओ