नवी दिल्ली : भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक आज बैठख बोलवण्यात आली आहे. सकाळी साडे नऊ वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह या बैठकीला उपस्थित असणार आहेत. तिहेरी तलाक विरोधी विधेयक या अधिवेशनात पास करण्यासाठी रणनिती आखली जाणार आहे. त्याचबरोबर तीन राज्यात असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी खासदारांना कानमंत्र दिला जाणार आहे. सरकारनं केलेली कामं लोकपर्यंत पोहचवा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत.


उपसभापती निवडणूक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी 9 ऑगस्टला मतदान होणार आहे. याबाबत रणनीती देखील या बैठकीत आखली जाणार आहे. उपसभापती पदासाठी एनडीएकडून जनता दल (यू) चे राज्यसभ खासदार हरिवंश नारायण सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विरोधी पक्ष देखील आपला वेगळा उमेदवार देऊ शकते. याबाबत अजून त्यांनी कोणतीही घोषणा केली नाही. राज्यसभेचे उपसभापती पी.जे कुरियन यांचा कार्यकाळ संपल्याने ही निवडणूक होत आहे.


9 ऑगस्टला मतदान


राज्यसभेचे सभापती वेंकैया नायडू यांनी सोमवारी उपसभापतीपदाच्या निवडणुकीची घोषणा केली. 9 ऑगस्टला सकाळी 11 वाजता उपसभापतीपदासाठी मतदान होणार आहे. पावसाळी अधिवेशन संपण्याच्या एक दिवस अगोदर राज्यसभेच्या उपसभापतीची निवड होणार आहे.