गांधीनगर : भाजपने केंद्रीय मंत्री अमित शाह आणि स्मृति ईरानी यांच्या रिक्त झालेल्या दोन राज्यसभेच्या जागा जिंकल्या आहेत. भाजपचे नामनिर्देशित उमेदवार परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. के. जयशंकर आणि उत्तर गुजरातच्या ओबीसी सेलचे सदस्य जुगलकिशोर ठाकोर विजयी झाले आहेत. दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसने दोन्ही जागांसाठी उमेदवार दिले होते. मात्र, त्यांचा पराभव झाला असून काँग्रेसच्या काही आमदारांनी या निवडणुकीसाठी क्रॉस मतदान केले. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला आवश्यक मते मिळालेली नाहीत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निवडणुकीला काँग्रेसकडून हरकत घेण्यात आली. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल उशिरा घोषित करण्यात आला. भाजपचे उमेदवार एस. जयशंकर यांना १०४ मते मिळाली आणि जुगलकिशोर ठाकोर यांना १०५ मते मिळाली. त्याच वेळी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना ७०-७० मते मिळाली.



याआधी शुक्रवारी सकाळी ९ वाजता मतदान झाले. दोन जागांसाठी निवडणूक आयोगाच्या (सीसी) निर्णयानुसार वेगवेगळे मतदान सुरु होते. भाजपचे दोन्ही उमेदवार १०० आमदारांच्या ताकतीवर निवडून आले आहेत. केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि उत्तर गुजरातचे ओबीसी सेलचे सदस्य जुगलकिशोर ठाकोर राज्यसभेत पोहोचले आहेत. काँग्रेसने दक्षिण गुजरातमधील ज्येष्ठ नेते चंद्रिका चुदासमा आणि गौरव पंड्या यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. मात्र, त्यांना मतदान फुटीचा फटका बसला. त्यामुळे ते अपेक्षीत मते घेऊ शकलेले नाहीत.