जम्मू-काश्मीरमध्ये फक्त 1 मताने भाजप उमेदवाराचा विजय
एका वार्डात तर उमेदवारांनीही मतदान केलं नाही.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील स्थानिक निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं आहे. पण भाजपचा एक उमेदवार फक्त 1 मताने निवडून आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये १३ वर्षांनंतर स्थानिक संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. चार टप्प्यांमध्ये येथे मतदान झालं. शनिवारी मतमोजणी झाली. या निवडणुकीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. एका ठिकाणी तर फक्त 3 मते मिळालेल्या उमेदवाराचा विजय झाला.
बारामुल्ला येथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले. श्रीनगर येथील एका वॉर्डात तर कोणीच जिंकू शकले नाही. कारण निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांनीही मतदान केलं नाही. राज्यात खूप कमी मतदान झाले होते.
बारामुल्ला आणि अनंतनाग जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत ५.१८ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत जम्मू भागात भाजपने २११ वॉर्डांमध्ये विजय मिळवला तर काश्मीरमध्ये ७९ जागांवर विजय मिळवत काँग्रेस पहिल्यास्थानी आला.