नवी दिल्ली : गुजरात निवडणूकीत कॉंग्रेस भाजपमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळाली. मात्र या लढाईत अचानक मशरूम प्रसिद्ध झाला. आणि याचे कारण होते अल्पेश ठाकोर.


अल्‍पेश ठाकोर यांना दिले मार्मिक उत्तर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्पेश ठाकोर यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पीएम मोदींच्या विदेशातून येणाऱ्या मशरूमवर निशाणा साधला होता. अशातच गुजरातमध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर भाजपाचे दिल्ली प्रवक्ता तेजिंदर बग्‍गा यांनी मशरूमचा केक कापून अल्‍पेश ठाकोर मार्मिक उत्तर दिले आहे. हा केक कापून त्यांनी म्हटले आहे की, हा केक मन साफ करेल रंग नाही.


मोदींच्या वैयक्तिक गोष्टीवर निशाणा


निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कांग्रेस नेता अल्पेश ठाकोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक गोष्टीवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशातून मशरूम मागवून खातात. आपली ही चैन भागवण्यासाठी ते दररोज देशाचे ४ लाख रुपये खर्च करतात. त्याचबरोबर ते म्हणाले की, मशरूम खाल्यामुळेच त्यांचे गाल लाल झाले आहेत. इतकंच नाही तर पुढे ते म्हणाले की, तुम्ही जर त्यांचा ३५ वर्षांपुर्वीचा फोटो पाहीलात तर ते पुर्वी असे दिसत नव्हते, परदेशी महागडे मशरूम खाऊन त्यांचे गाल लाल झाले आहेत. 


त्यांच्या या आरोपाला प्रतित्युर देण्यासाठी तेजिंदर बग्‍गा यांनी मशरूम केक कापला. आणि त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. 



 १५ हजार मतांनी हरवले


अल्‍पेश ठाकोर हे ओबीसी नेता असून राधनपूर येथून त्यांनी निवडणूक लढवली. त्यांनी भाजपच्या लविंग जी ठाकोर यांना सुमारे १५ हजार मतांनी हरवून आपली जित प्रस्थापित केली आहे.