अहमदाबाद : गुजरातमध्ये भाजप हिमाचल प्रदेश प्रमाणेच जातीच्या आधारे मुख्यमंत्रीपदासाठी नाव घोषित करु शकतात.


मुख्यमंत्रीपदासाठी कोणाचं नाव चर्चेत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप या पदासाठी पटेल उमेदवाराचं नाव घोषित करु शकते. उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचं नाव जोरदार चर्चेत आहे. पक्षाने पटेल समाजाला आकर्षित करण्यासाठी याबद्दल विचार केला आहे.


भाजपला वाटतेय भीती


गुजरात विधानसभेसाठी ९ डिसेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. ७ डिसेंबरला प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. पटेल भागामध्ये अजून भाजपची रॅली सामान्य राहिली आहे. लोकांमध्ये उत्साह कमी दिसत आहे. मागील १० वर्षात मोदींच्या बाबतीत मोठा उत्साह असायचा पण तो आता कमी झालेला दिसत आहे. काँग्रेस याचा फायदा घेत पटेल भागात मोठ्या प्रमाणात रॅली आणि शक्तीप्रदर्शन करत आहे. 


हिमाचल सारखी वापरणार रणनीती


पटेल यांना भाजपने दुय्यम दर्जाचं स्थान दिल्याचा आरोप होत आहे. अशा परिस्थिती मुख्यमंत्रीपदासाठी पटेल उमेदवाराची घोषणा करुन विजय मिळवण्याचा प्रयत्न भाजपचा असणार आहे. त्यामुळे नितीन पटेल यांचं नाव आता चर्चेत आलं आहे. भाजपने ही रणनीती हिमाचलमध्ये वापरली होती. प्रेम कुमार धूमल यांना मुख्यमंत्रीपदासाठी नाव घोषित करुन राजपूत समाजाचे मतं आपल्याकडे आकर्षित केली होती.