`तीन तलाक विरोधी आणि कसाईंनी भाजपला मतं दिली नाहीत`
भाजपच्या गुजरात विधानसभेता जागा कमी का झाल्या, यावर प्रतिक्रिया दिली आहे. जडेजा यांनी म्हटलंय.
गांधीनगर : गुजरातचे गृह राज्यमंत्री प्रदीप सिंह जडेजा यांनी भाजपच्या गुजरात विधानसभेता जागा कमी का झाल्या, यावर प्रतिक्रिया दिली आहे. जडेजा यांनी म्हटलंय.
गृह राज्यमंत्री प्रदीप सिंह जडेजा म्हणतात...
गुजरात विधानसभेत भाजपच्या जागा ९९ पेक्षा कमी होण्याचं कारण, हे कसाई आणि मद्य तस्कर आहे, आणि तिसरं आहे प्रस्तावित तीन तलाक विधेयक, या बाबतीत विरोधकांनी भगवा पार्टीला मतदान केलं नाही.
भाजप सरकार वाचवण्यास यशस्वी
डिसेंबरमध्ये सलग सहाव्या वेळेस गुजरातमध्ये भाजपा सत्तेत आली, मात्र यावेळी जागा १०० पेक्षा कमी झाल्या, मात्र भाजप सरकार वाचवण्यास यशस्वी झालं.गुजरात विधानसभेच्या १८२ जागांपैकी काँग्रेसने ७७ जागा जिंकल्या, काँग्रेसचा आकडा मात्र वाढला.
नाराजांनी मतं दिली नाहीत
जडेजा यांनी विधानसभेत बोलताना सांगितलं, मी आपल्याला सांगू इच्छीतो, की आम्हाला कुणी मतदान नाही केलं, जे कसाई लोक होते, जे गोवंश हत्या विरोधी कायद्याचा प्रचंड विरोध करतात, ते आमच्याशी नाराज होते, दारू तस्करही आमच्यावर नाराज होते, कारण दारूबंदी कायदा भाजपने आणला.