बिहार आणि युपी पोटनिवडणुकीमध्ये भाजप आघाडीवर
उत्तर प्रदेशमधील गोरखपूर, फूलपूर आणि बिहारच्या अररिया लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीचा आज निकाल आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेशमधील गोरखपूर, फूलपूर आणि बिहारच्या अररिया लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीचा आज निकाल आहे.
बिहारच्या जहानाबाद आणि भभुआ विधानसभा मतदारसंघात देखील मतमोजणी सुरु आहे.
लाईव्ह अपडेट
- गोरखपूर : भाजपच्या मतदाराला १५५७७ मतं आणि सपाच्या उमेदवाराला १३९११ मतं
- फूलपूरमधून सपाचा उमेदवार ३६०७ मतांनी पुढे
- बिहार पोटनिवडणूक: अररियामधून आरजेडीचा उमेदवार पुढे
- बिहार: अररियामधून भाजप २३०० मतांनी पुढे
- गोरखपूरमधून भाजपचे उपेंद्र शुक्ला पुढे
- भभुआमधून देखील भाजपचे उमेदवार पुढे
- फूलपूरमध्ये भाजप आणि सपामध्ये कांटे की टक्कर दिसते आहे.
- अररिया लोकसभा निवडणुकीत ५७ टक्के मतदान झालं होतं. बिहारच्या भभुआमध्ये ५४.०३ तर जहानाबादमध्ये ५०.०६ टक्के मतदान झालं होतं.
गोरखपूरमधून १० तर फूलमधून २२ उमेदवार निवडणुकीच्य़ा रिंगणात होते. गोरखपूर सीटवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तर फूलपूर सीटवर उप-मुख्यमंत्री केशव मौर्य हे विधानपरिषदेचे सदस्य झाल्याने त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता.