भाजप, जेडीयू आणि लोजपामध्ये उद्या जागा वाटपाचा निर्णय
जागा वाटपाची घोषणा रविवार पर्यंत पुढे गेली आहे.
पटना : बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी (भाजप), जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि लोक जनशक्ती पार्टी (लोजपा) यांच्यामध्ये जागा वाटपाचा आज होणारा निर्णय पुढे गेलाय. शुक्रवार पासून तीन पार्टींमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. लोक जनशक्ती पार्टी संसदीय बोर्डाचे नेता चिराग पासवान फिलहान सध्या मुंबईत आहेत. त्यामुळे जागा वाटपाची घोषणा रविवार पर्यंत पुढे गेली आहे.
याआधी शुक्रवारी अर्थ मंत्री अरुण जेटलींनी लोजपा नेते चिराग पासवान यांच्या सोबत दोन-दोन वेळा मिटींग केली. तिनही पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन जागा वाटपाची माहिती दिली.
मुख्यमंत्री नितिश कुमार आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह समान जागांवर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. दोन्ही पक्ष प्रत्येकी 17 जागांवर निवडणूक लढवतील तर लोजपाच्या खात्यात 6 लोकसभा आणि एक राज्यसभा जागा आली आहे.
आरजेडीला शह
पक्षातील वरिष्ठ नेता दिल्लीमध्ये असून तिथे त्यांची चर्चा सुरू आहे. लवकरच निर्णय होईल अशी आशा जोडीयू नेता अशोक चौधरी यांनी व्यक्त केली. जागा वाटप सहज होईल असे पथ निर्माण मंत्री नंदकिशोर यादव यांनी सांगितले. काल देखील एनडीएतील वरिष्ठ नेते भेटले होते, आज देखील भेटतील. आरजेडीचे कोणतेच स्वप्न पूर्ण होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.