सुरत : अभिनेत्री आणि भाजप नेत्या मौसमी चटर्जी यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. मंदिरात जीन्स घालून जाऊ नका, असे वादग्रस्त विधान मौसमी चटर्जी यांनी केले आहे. मंदिरात जीन्स घालून जाल तर अडचण होईल. त्यामुळे पंजाबी ड्रेस किंवा साडी घालून मंदिरात जायला हवे. आपली संस्कृती जपायला हवी, असा अजब सल्ला चटर्जी यांनी सुरतमध्ये भाजपने आयोजित केलेल्या चर्चासत्रात दिला आहे.


भाजपमध्ये सेलिब्रिटींचा भरणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप पक्ष मजबूत करण्यासाठी तयारी करत आहे. पश्चिम बंगालशी संबंधित असलेल्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यापैकी अभिनेत्री रुपा गांगुली, रिमी सेन आणि गायक बाबुल सुप्रियो हे प्रमुख आहेत. बॉलिवूड अभिनेत्री मौसमी चॅटर्जी भारतीय जनता पार्टी (भाजप)मध्ये सामील झाली. भाजपचे सरचिटणीस आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मौसमी चॅटर्जी यांच्या भाजपमध्ये प्रवेश केल्याने पश्चिम बंगालमध्ये भाजपला चांगली संधी प्राप्त झाली आहे.


काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल


२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत मौसमी चॅटर्जी भाजपकडून निवडणूक लढवू शकतात. २००४ मध्ये कोलकाताच्या उत्तर-पूर्व मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय-एम) उमेदवार मोहम्मद सलीम यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. २०१५ मध्ये, मौसमी चॅटर्जी यांनी शुजीत सरकारच्या 'पीकू' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुन्हा पुनरागमन केले. मात्र, या चित्रपटानंतर ती सिनेमा इंडस्ट्रीतून गायब झाली होती.