Tukde Tukde Gang: मध्य प्रदेशचे गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरोत्तम मिश्रा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. यावेळी त्यांनी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांवर जोरदार निशाणा साधला आहे. बॉलीवूड अभिनेत्री शबाना आझमी, जावेद अख्तर आणि नसीरुद्दीन शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नरोत्तम मिश्रा यांनी शबाना आझमी, जावेद अख्तर आणि नसीरुद्दीन शाह यांना 'तुकडे-तुकडे' गँगच्या स्लीपर सेलचे एजंट आहे, असा धक्कादायक आरोप केला आहे. गुरुवारी शबाना आझमी यांनी बिल्किस बानो सामूहिक बलात्कारातील दोषींच्या सुटकेवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मिश्रा यांनी त्यांचावर टीका केली आहे. (bjp leader calls shabana azmi javed akhtar naseeruddin shah agent and sleeper cell of tukde tukde gang)


''भाजपशासित नसलेल्या राज्यात गुन्हेगार नाही का?''


''जेव्हा गैर-भाजप राज्यात गुन्हे घडतात तेव्हा हे लोक एक शब्दही उच्चारत नाहीत. कारण त्यांना फक्त भाजपशासित राज्यांमध्येच गुन्हे दिसतात. या सर्वांना देशात राहण्याची भीती वाटू लागली आहे. हे सर्व लोक अचानक ओरडू लागली आहे.'' या शब्दात नरोत्तम मिश्रा यांनी हल्लाबोल केला. 


झारखंड आणि उदयपूरवर मौन का?


नरोत्तम मिश्रा पुढे म्हणाले की, ''झारखंडमध्ये अल्पवयीन मुलीला जिवंत जाळण्यात आले तेव्हा हे लोक गप्प का होते, राजस्थानमधील कन्हैया लालच्या हत्येवर ते एक शब्दही का बोलले नाही? नरोत्तम मिश्रा यांनी शबाना आझमी आणि नसीरुद्दीन शाह यांसारख्या लोकांना तुकडे-तुकडे टोळीच्या स्लीपर सेलचे एजंट म्हणून संबोधित केले आहे आणि हे लोक काँग्रेस शासित राज्यांमध्ये घडणाऱ्या घटनांवर मौन बाळगतात. तर याच लोकांनी पुरस्कार परत करण्यासाठी पुढाकार घेतला. आता अशा लोकांचा पर्दाफाश झाला आहे.''