भोपाळ : मध्यप्रदेशमध्ये कलमनाथ सरकारने अंगणवाडी मुलं, गर्भवती महिला आणि शाळांमधील माध्यान्ह जेवणात अंडी देण्याचा निर्णय घेतला. मध्यप्रदेशमधून कुपोषण दूर करण्यासाठी, कुपोषणाशी लढण्यासाठी मुलांना जेवणात अंडी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र विरोधकांच्या आक्षेपानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. सरकारच्या अंडी देण्याच्या निर्णयावर भाजपाने नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे काँग्रेस आणि भाजपामध्ये शाब्दिक युद्ध सुरु झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारच्या अंडी देण्याच्या निर्णयावर भाजपाने धार्मिक भावना दुखवल्या जाण्याचं सांगितलं. तर दुसरीकडे काँग्रेसने अंड शाहाकारी असून ते महिला आणि मुलांच्या आरोग्यासाठी आवश्यक असल्याचं म्हटलंय.


शाळांमधील माध्यान्य जेवणात, अंगणवाडी मुलं आणि गर्भवती महिलांना अंडी देण्याच्या सरकारच्या निर्णयावर भाजपा नेता गोपाल भार्गव यांनी सांगितलं की, 'भारताचे जे संस्कार आहेत, सनातन संस्कृतीमध्ये मांसाहार निषेध आहे. लहानपणापासूनच मांसाहार दिल्यास मुलं मोठी होऊन नरभक्षी होऊ शकतात. तसंच यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात' असं ते म्हणाले. 


कुपोषण दूर करण्यासाठी अंगणवाडी मुलांना अंडी खाण्यास देण्याच्या कमलनाथ सरकारच्या निर्णयाला माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील विरोध केला आहे. कोणी काय खाल्लं पाहिजे? हे प्रत्येकावर अवलंबून आहे. पण सरकारकडून अंडी दिली गेल्यास, न खाणाऱ्यालादेखील अंडी जबरदस्ती खायला लागू शकतात, असं ते म्हणाले.



मुलांना अंडी खाण्यास देण्याच्या निर्णयाला विरोध करत त्यांनी, अंड्याला आणखीही काही पर्याय उपलब्ध आहे. पोषण आहारासाठी अंड्याशिवाय अनेक पर्याय आहेत. आमचं सरकार असताना अंड्याच्या या प्रस्तावाला आम्ही विरोध करत, त्याऐवजी अंगणवाडीमध्ये दूध देण्यात येत असल्याचं ते म्हणाले.


  


मध्यप्रदेशमध्ये अंडी देण्याच्या निर्णयावर ठाम असलेल्या महिला आणि बाल कल्याण मंत्री इमरती देवी यांनी, अंड शाहाकारी असल्याचं सांगितलं. अंडी का खाऊ नये? असा सवाल करत त्यांनी, आपल्या सर्वांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी सर्व खावं लागेल. असं त्या म्हणाल्या.


गोपाल भार्गव यांच्या नरभक्षी विधानावर बोलताना त्यांनी, त्यांच्या बोलण्याने काही होणार नाही. मध्यप्रदेश कुपोषणमुक्त होण्याची माझी इच्छा आहे. त्यांच्या बोलण्याने काय होतं? त्यांच्यासारखे हॉटेलमध्ये जाऊन मांसाहार करत असल्याची टीकादेखील त्यांनी केली आहे.