Sumitra Mahajan on Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कन्याकुमारीपासून 'भारत जोडो' यात्रा  ( Bharat Jodo Yatra) सुरु केली आहे. (Political News) ही यात्रा आता महाराष्ट्रात सुरु आहे. त्यानंतर ती मध्यप्रदेशकडे रवाना होणार आहे. याचदरम्यान, लोकसभेच्या माजी सभापती आणि भाजप नेत्या सुमित्रा महाजन ( Sumitra Mahajan) यांनी कौतुक केले आहे. भाजपकडून सातत्याने काँग्रेसवर टीका करण्यात येत आहे. त्याचवेळी राहुल गांधींची खिल्ली उडविण्यात येत असताना सुमित्रा महाजन यांनी राहुल गांधी यांचे कौतुक केल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.


महापुरुषही आधी देश फिरले होते...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'भारत जोडो' यात्रेचे  ( Bharat Jodo Yatra) कौतुक करताना सुमित्रा महाजन म्हणाल्या, महापुरुषही आधी देश फिरले. मी जेव्हा प्रवचन करायचे तेव्हा महापुरुषांचे उदाहरण देत होते. जेवढ्या महापुरुषांनी देशासाठी काम केलं, ते आधी देश फिरले. त्यानंतर कामाला सुरुवात केली. त्याचप्रमाणे एका युवा अर्थात राहुल गांधी यांना देश फिरायची इच्छा झाली, ही खूप चांगली गोष्ट आहे. ते स्वत: देश समजून घेत आहेत. ही गोष्ट चांगली आहे, अशा शब्दात सुमित्रा महाजन ( Sumitra Mahajan) यांनी राहुल यांच्या   'भारत जोडो' यात्रेचे  ( Bharat Jodo Yatra) कौतुक केले आहे. 



राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो'चे भाजप नेत्याकडून असे कौतुक केल्याने अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातखाली ‘भारत जोडो’ यात्रा सुरु आहे. या यात्रेला जनतून मोठा प्रतिसाद मिळत आहेत. त्याचवेळी भाजपच्या नेत्याकडून कौतुक होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्यावेळी भाजपने सुमित्रा महाजन यांना उमेदवारी दिली नव्हती. त्या नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या  'भारत जोडो' यात्रा  (Bharat Jodo Yatra) कौतुक केल्याने त्या चर्तेत आल्या आहेत.


Bharat Jodo Yatra यात्रा महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात


येत्या 20 नोव्हेंबरला राहुल गांधी यांची Bharat Jodo Yatra यात्रा महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात प्रवेश करणार आहे. या पार्श्वभूमीवर सुमित्रा महाजन यांनी त्यांच्यावर कौतुक केल्याने याला राजकीय वर्तुळात मोठी महत्व आले आहे.  सुमित्रा महाजन म्हणाल्या की,  राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण देश समजून घेतील. आपण लोकशाहीत आहोत आणि लोकशाहीत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वपूर्ण असते.



देशात विरोधी पक्षही मजबूत असला पाहिजे. जो संपूर्ण देशाला डोळ्यासमोर ठेवून बोलला पाहिजे. आम्ही जेव्हा विरोधात होतो, तेव्हा अटल बिहारी वाजपेयीजी, लालकृष्ण अडवाणी देशासाठी बोलत होते. त्यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव होती. तसेच आता हा प्रयत्न होताना दिसत आहे, असे सुमित्रा महाजन यांनी म्हटले आहे.