नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमध्ये आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी 5 वाजता निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. 9 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 18 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. म्हणून सर्व पक्षांच्या नेत्यांनी शेवटच्या दिवशी जोरदार प्रयत्न करायला सुरुवात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गृहमंत्री राजनाथ सिंह, माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेन्द्र सिंह रावत हिमाचल प्रदेशला पोहोचले आहेत.


निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत की, प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर जिल्हा प्रशासनाने हे सुनिश्चित करावे की, सर्व राजकीय प्रतिनिधी आपल्या विधानसभा क्षेत्रांमध्ये लगेच प्रस्थान करतील. राज्याच 7 ते 9 नोव्हेंबर आणि 18 डिसेंबर रोजी ड्राय डे घोषित केला आहे.


राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी पुष्पेंद्र राजपूत यांनी सांगितले की, प्रदेशामध्ये स्वतंत्र, निःपक्षपाती, शांत आणि व्यवस्थित मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी व्यवस्था केली आहे. 9 नोव्हेंबर रोजी मतदान शांतिपूर्ण पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलीस, आयटीबीपी आणि बीएसएफचे जवान ड्यूटीवर पोहचले आहेत.