मुंबई : बिहारच्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे बिहार प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी, पक्षाचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी यांना कोरोनाची लागण झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवेंद्र फडणवीस यांची माहिती 


देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटरवरुन त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली. त्यांनी लिहिले की, 'लॉकडाऊनपासून ते सतत काम करत होते, परंतु कदाचित त्यांन थोडी विश्रांती घ्यावी ही देवाची इच्छा आहे. मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे आणि मी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व आवश्यक औषधे आणि उपचार घेत आहे.'


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी, गेल्या काही दिवसांत त्यांच्याशी संपर्कात आलेल्या लोकांना कोरोनाची चाचणी करुन घेण्याचं आव्हान केलं आहे.


बिहारमधील भाजप नेत्यांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिहार निवडणुकीची जबाबदारी होती. त्याच्या शिवाय सुशील मोदी, शाहनवाज हुसैन आणि राजीव प्रताप रुडी यांच्या सारख्या महत्त्वाच्या नेत्यांना ही कोरोनाची लागण झाल्याने याचा फटका निवडणूक प्रचारात बसणार आहे.