नवी दिल्ली : ईशान्य भारतात झालेल्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं घवघवीत यश मिळवलं आहे. त्रिपुरामध्ये भाजपला बहुमत मिळालं आहे. या राज्यामध्ये २५ वर्ष असलेली डाव्यांची सत्ता भाजपनं उलथवून लावली आहे. तर नागालँडमध्येही भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. ६० मतदारसंघाच्या या राज्यामध्ये भाजपला २९ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे नागालँडमध्येही भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे निश्चित मानलं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेघालयमध्ये मात्र काँग्रेस हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष बनला आहे. ५९ मतदारसंघाच्या या राज्यामध्ये काँग्रेसला २१ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला २ जागांवर यश मिळालं आहे.


भाजपनं घडवला इतिहास


याबरोबरच भाजपनं २० राज्यांमध्ये सत्ता असण्याचा विक्रम केला आहे. याआधी २४ वर्षांपूर्वी काँग्रेसचं १८ राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांसोबतचं आघाडी सरकार होतं. त्यावेळी काँग्रेसकडे १५ राज्यांमध्ये सत्ता होती. तर एका राज्यात आघाडीचं सरकार आणि अन्य दोन राज्यांमध्ये माकपचं सरकार होतं. या सरकारला काँग्रेसनं पाठिंबा दिला होता.


या राज्यांमध्ये भाजपची सत्ता


महाराष्ट्र


गुजरात


राजस्थान


मध्य प्रदेश


छत्तीसगड


नागालँड


त्रिपुरा


बिहार


आसाम


अरुणाचल प्रदेश


उत्तर प्रदेश


उत्तराखंड


गोवा


मणीपूर


हिमाचल प्रदेश


हरियाणा


जम्मू काश्मीर


झारखंड


सिक्कीम


आंध्र प्रदेश