नितीशकुमारांना भाजप देऊ शकतो पाठिंबा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक होणार आहे. या संसदीय मंडळाच्या बैठकीत जेडीयूला पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा केली जाऊ शकते.
नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक होणार आहे. या संसदीय मंडळाच्या बैठकीत जेडीयूला पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा केली जाऊ शकते.
नितीश कुमार यांनी बुधवारी साडे सहा वाजता राजभवनात जाऊन राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे राजीनामा दिला.
नितीश कुमार बुधवारी जेडीयू आमदारांची बैठक झाली. त्यानंतर राज्यपालांना भेटण्यासाठी नितीश कुमार गेले. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या बेनामी संपत्तीच्या प्रकरणात जेडी यू आणि राजद यांच्यात
वाद निर्माण झाला, त्याचे पर्यवसन नितीश कुमार यांच्या राजीनाम्यात झाले.
२४३ सदस्यांच्या विधानसभेत मॅजिक फिगर म्हणून १२२ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. सध्या लालूंच्या राजदचे ८०, काँग्रेस २७, जेडीयूचे ७१ आणि भाजपचे ५३ आमदार आहेत. तसेच इतर चार आमदार आहे.
भाजपसोबत गेल्यास
जेडीयू ७१, भाजप ५३ आणि ४ अपक्ष = १२८
गेल्या काही दिवसांपासून जेडीयू आणि भाजप यांच्या जवळीकता वाढली आहे. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती म्हणून पाठिंबा दिल्यानंतर भाजपसोबत जाण्याचे नितीशकुमार यांनी संकेत दिले होते.