नवी दिल्ली : कोरोना व्हायरसची (Coronavirus) दुसरी लाट सर्वत्र विनाश ओढवतेय. केंद्रातून राज्यापर्यंतची सरकारे त्यास सामोरे जाण्यासाठी पूर्ण ताकदीने लढत आहेत. दुसरीकडे, सरकारमध्ये बसलेले लोकप्रतिनिधी विचित्र विधाने करून लक्ष वेधून घेत आहेत. अशीच एक घटना यूपी मधून समोर आली आहे. गोमूत्र (Cow urine) प्यायल्याने कोरोना विषाणूपासून वाचता येईल असा दावा एका आमदाराने केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूपीमधील बलियामधील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह (Surendra Singh)यांनी यासंदर्भात तर्कहिन विधान केले आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी गोमूत्र सेवन केल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामुळे ते कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचल्याचे त्यांनी म्हटले. इतकेच नव्हे तर एका ग्लास थंड पाण्यात गोमूत्र घालून पिण्याचा सल्लाही त्यांनी लोकांना दिला आहे.



आमदार सुरेंद्रसिंगही वादात सापडण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी देखील त्यांनी अशा प्रकारची विधाने करुन रोष ओढावून घेतलाय. यावर्षी जानेवारीत त्यांचा स्वतःच्याच पक्षाचे खासदार वीरेंदरसिंग मस्त यांच्याशी वाद झाला होता. एका सभेत त्यांनी खासदाराला विरोध केला आणि सभा मध्यभागी सोडली. यावेळी जोरदार गोंधळ उडाला.



कालच्या आकडेवारीनुसार, देशात सलग 3 दिवस कोरोना विषाणूच्या संसर्गाची 4 लाखाहून अधिक नोंदवली गेली आहेत. त्याचबरोबर 4 हजारांहून अधिक मृत्यूदेखील झाले आहेत.