मुंबई : पुलवामा हल्ल्यानंतर भारतात पाकिस्कानविरोधी वातारवरणाचा भडका उडाला आहे. या वातावरणाचे पडसाद कला आणि क्रीडा क्षेत्रावरही उमटल्याचं पाहायला मिळत आहे. एकिकडे क्रिकेट विश्वात पाकिस्तानी कलाकारांचे फोटोही अनेक ठिकाणच्या क्रिकेट क्लबमधून हटवण्यात आले आहेत, तिथेच आता टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्यावरही पाकिस्तानी क्रिकेटपटूशी लग्न करण्याच्या मुद्द्यावरुन निशाणा साधण्याच येत आहे. एका भाजप नेत्याने तर तिचा उल्लेख 'पाकिस्तानी बहू', म्हणजेच पासकिस्तानची सून असाही केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी राजा सिंह असं त्या भाजप नेत्याचं नाव असून, त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. सानिया पाकिस्तानची सून आहे. त्यामुळे तेलंगणाच्या सदिच्छादूत अर्थात ब्रँड अॅम्बेसेडर पदावरुन तिला हटवण्यात यावं अशी मागणीही त्यांनी उचलून धरली आहे. पुलवामात झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आपली भूमिका स्पष्ट करतेवेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. 


एका व्हिडिओ मेसेजमधून त्यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडे ही मागणी करत दहशतवादी कारवायांना आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानशी सर्व प्रकारचे संबंध तोडण्याचा मुद्दा मांडला. या भ्याड हल्ल्याचा सारा देश निषेध करत आहे, असं म्हणत त्यांनी चंद्रशेखर राव यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या क्रार्यक्रमांना रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल या निर्णयाची प्रशंसाही केली.


पाकिस्तानविरोधी वातावरण पाहता सानियाच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदाविषयी पुनर्विचार केला जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


पुलवामा हल्ल्याविषयी सानियाच्या ट्विटने आलं असंख्य चर्चांना उधाण 


सोशल मीडियावर व्यक्त न होण्याचा अर्थ असा नाही की आपण पुलवामा हल्ल्याचा निषेध करत नाही, अशा आशयाची एक ट्विटर पोस्ट तिने शेअर केली. या संपूर्ण पोस्टमध्ये तिने आपण दहशतवादाचा विरोध करत असल्याचं म्हटलं होतं. पण, या संपूर्ण पोस्टमध्ये पाकिस्तानचा उल्लेखही नव्हता. ज्यामुळे तिच्यावर अनेकांचाच रोष ओढावला होता.