रांची: वाचाळवीर नेत्यांमुळे टीकेला तोंड द्यावे लागणे, ही बाब आता भाजपसाठी काही नवीन राहिलेली नाही. यामध्ये आता झारखंडमधल्या आणखी नेत्याची भर पडली आहे. या महाशयांनी गावकऱ्यांना पूल बांधण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण केले. त्यामुळे गावातील एका कार्यकर्त्याने चक्क त्यांचे पाय धुऊन ते पाणी प्राशन केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेनंतर खासदार निशिकांत दुबे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.दुबे हे झारखंडमधल्या गड्डाचे खासदार आहेत. ते एका कार्यक्रमासाठी आले असता भाजप कार्यकर्ते पवन शाह यांनी त्यांचे पाय धुतले. त्यानंतर पाय धुण्यात आलेले पाणी त्यांची तीर्थ म्हणून प्यायले.  कार्यकर्त्याने दुबे यांचे पाय धुतलेले पाणी प्यायले तेव्हा निशिकांत यांनी अडवले नाही. उलट ही घटना त्यांनी त्यांच्या फेसबुकवर शेअर केली. या व्हिडिओवरून वादाला तोंड फुटलेलं पाहिल्यावर दुबे म्हणाले की, 'जर नागरिक त्यांचा आनंद पाय धुवून साजरा करत असतील तर त्यात काय वाईट आहे?'


 विशेष म्हणजे यामध्ये आपण काहीही गुन्हा केला नाही,  दुबे हे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. त्यांच्याप्रती या माझ्या भावना आहेत, असे पवन शाह यांनी सांगितले.