मुंबई : भोपाळच्या वादग्रस्त खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा वादात सापडल्या आहेत. मध्यप्रदेश काँग्रेसनं आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ अपलोड केला असून, त्यात प्रज्ञा सिंह ठाकूर विमानात प्रवाशांसोबत वाद घालताना दिसत होत्या. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हि़डिओत शाब्दिक चकमकीत एक प्रवाशीही साध्वी यांच्याशी हुज्जत घालताना दिसतोय. विमानात झालेल्या वादा-वादीनंतर खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.हा वाद कुणामुळं झाला? जे नियम तयार केलेत ते चुकीचे आहेत, असा आरोप त्यांनी केला. मला ती जागा द्यायला नको होती, असं सांगत वादाचं खापर त्यांनी विमान कर्मचाऱ्यांवर फोडलं. (विमानातील सीटवरून साध्वी प्रज्ञांचा गोंधळ; प्रवाशी संतापले) 


 



या व्हीडिओत साध्वी प्रज्ञा प्रवाशांशी वाद घालताना दिसत आहेत. साध्वी प्रज्ञा या कोणतीही आगाऊ सूचना न देता व्हीलचेअर घेऊन विमानात आल्या. विमानातील कर्मचाऱ्यांना याची कल्पना नव्हती. मात्र, तरीही साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना विमानात बसण्याची मुभा देण्यात आली. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना दुसऱ्या आसनावर बसण्यास सांगण्यात आले. परंतु साध्वी प्रज्ञा यांनी कर्मचारी आणि सहप्रवाशांशी हुज्जत घालायला सुरुवात केली.


काहीतरी कारण आहे म्हणूनच प्रथम दर्जा आणि माझ्यासाठी सुविधा नसतानाही मी या विमानातून प्रवास करत आहे, असे प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटले. मात्र, संबंधित प्रवाशाने माघार घेण्यास नकार दिला. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. आम्हाला त्रास देणे हे तुमचे काम नाही. तुम्ही पुढच्या विमानाने यायला पाहिजे होते. तुमच्या एकट्यामुळे ५० प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. मात्र, तुम्हाला जराही शरम वाटत नाही, असे प्रवाशाने त्यांना सुनावले.