नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन (Parliament Winter Session) 29 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. मात्र, त्यापूर्वीच विरोधी पक्षांतील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) हिवाळी अधिवेशनापूर्वी तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. ममता बॅनर्जी 22 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान दिल्लीत राहणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरुण गांधींसमोर टीएमसीचा पर्याय?
या दौऱ्यात ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, ममता बॅनर्जी दिल्लीत भाजप खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांची भेट घेणार असल्याचं बोलले जात आहे. भाजपमध्ये (BJP) नाराज असलेले वरुण गांधी येत्या काही दिवसांत भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश करू शकतात अशी जोरदार चर्चा आहे. अलीकडेच  वरुण गांधी आणि त्यांची आई मनेका गांधी यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर काढण्यात आलं होतं.


आता वरुण गांधी भाजप सोडण्याच्या विचारात आहेत. अशा स्थितीत त्यांना नव्या राजकीय व्यासपीठाची गरज भासणार आहे. काँग्रेसमध्ये जाणे त्यांना शक्य नाही. अशा परिस्थितीत वरुण गांधी यांच्यासमोर टीएमसी हा पर्याय आहे. विशेष म्हणजे वरुण गांधी यांनी नुकताच लखीमपूर हिंसाचाराचा निषेध केला होता. महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त नथुरामने गोडसेविरोधातही आवाज उठवला होता.


ममता बॅनर्जी आक्रमक
याआधी ममता बॅनर्जी मे महिन्यात पश्मिच बंगालमधील विजयानंतर जूनमध्ये दिल्लीत आल्या होत्या.  यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, कमलनाथ आणि आनंद शर्मा या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली होती.   'येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपपेक्षा विरोधक मजबूत असतील,  2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधक इतिहास रचतील, असा दावा यावेळीक ममता बॅनर्जी यांनी केला होता. तसं लोकसभा निवडणूक मोदी विरुद्ध देश अशी असेल असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं. आता या दिल्ली दौऱ्यातही ममता बॅनर्जी काँग्रेस, सपा, बसपा या पक्षांच्या नेत्यांनाही भेटू शकतात.