नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत एनडीएने शानदार कामगिरी करत ४ राज्यांमध्ये सत्ता मिळवली. विधानसभा निवडणूक निकालाच्या 4 दिवसानंतर जेव्हा बजेट सत्राच्या दुसऱ्या भागाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) सोमवारी लोकसभेत (Loksabha) पोहोचले. तेव्हा भाजपच्या खासदारांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. कामकाज सुरु होण्याच्या काही मिनिटाआधी पंतप्रधान लोकसभेत पोहोचले. पंतप्रधान पोहोचताच मोदी-मोदीचे नारे (Modi-modi Chants) लागले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सदनात पंतप्रधान मोदींचं स्वागत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath singh) यांच्यासह इतर एनडीएमधील नेत्यांनी देखील त्यांचं स्वागत केलं. फेब्रुवारी-मार्च मध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच सदनाती बैठक होत आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि इतर विरोधी पक्षाचे नेते देखील यावेळी संसदेत उपस्थित होते.



४ राज्यात भाजपची सत्ता


भाजपने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये मोठा विजय मिळवलाय. आम आदमी पक्षाने देखील पंजाबमध्ये सत्ता मिळवत सगळ्यांना धक्का दिलाय. दुसरीकडे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. 


पंतप्रधानांच्या स्वागतानंतर लोकसभा अध्यक्षांनी ऑस्ट्रियाई प्रतिनिधिमंडळाचं स्वागत केलं. या प्रतिनिधिमंडळाचं नेतृत्व ऑस्ट्रियाच्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष वोल्फगँग सोबोटका यांनी केलं. ओम बिडला यांनी म्हटलं की, ही टीम 13 मार्चला भारतात आली होती. त्यांनी आधी आग्रा दौरा केला. 17 मार्चला ऑस्ट्रियाला परण्यापूर्वी हैदराबादला देखील जाणार आहे.