दिल्लीत राज्यातील खासदारांची अमित शाहांबरोबर बैठक
नवीन वर्षात भाजपकडून पहिलीच बैठक महाराष्ट्रातील खासदारांची बोलवण्यात आली आहे.
नवी दिल्ली : नवीन वर्षात भाजपकडून पहिलीच बैठक महाराष्ट्रातील खासदारांची बोलवण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय चर्चा होणार याची उत्सुकता लागलेय.
या बैठकीत कोणकोणत्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे. कशा प्रकारे मतदारसंघात केंद्र सरकारची कामं पोहोचवायची यासंदर्भात मार्गदर्शन केलं जाणार आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे केंद्रातील मंत्री उपस्थित राहणार आहेत. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, सुभाष भामरे, हंसराज अहिर बैठकीत हजर राहणार आहेत.