मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुका जवळ येताच सर्व पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी कोणतीही चूक होऊ नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत. 


भाजपचं नवीन धोरण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपने गुजरात विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी एक नवीन धोरण तयार केलं आहे. भाजपने प्रचार मोहिमेसोबत बूथ व्यवस्थापनही बळकट करण्याची तयारी केली आहे. भाजपने 10 ऐवजी 30 कार्यकर्त्यांसोबत रणनीतीवर काम करणं सुरू केलं आहे. जेणेकर एका कार्यकर्त्यावर फक्त 25 ते 30 मतदारांची जबाबदारी असेल.


बूथ मॅनेजमेंटवर सर्वाधिक भर


पक्षाला असे वाटते की ह्या धोरणानुसार कार्यकर्ता अधिक प्रभावीपणे मतदारापर्यंत पोहोचू शकतील. पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांचा सर्वाधिक जोर हा बूथ मॅनेजमेंटवर असतो. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाचे कारण शाहचं बूथ व्यवस्थापन होतं. आपल्या गुजरातमध्ये बूथ मॅनेजमेंटमध्ये कोणतीही कमी पडू नये म्हणून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.