नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीच्या दिग्गज नेत्यांवर सध्या आजारपणाचे सावट घोंघावत आहे. आपले वैयक्तिक आजारपण बाजूला ठेवून ते कार्यकर्त्यांना भेटत आहेत हे आपण गेल्या काही दिवासांपासून पाहतोय. मनोहर पर्रिकरांचा असाच एक फोटो व्हायरल झाला होता. मागे सुषमा स्वराज यांच्या आजारपणाचीही बातमी आली होती. आता भाजप अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्लू झाल्याचे समोर आले. भाजचे कोणकोणते नेते आजारपणाशी झुंझत आहेत ? याबद्दल घेतलेला हा आढावा...


भाजप अध्यक्ष अमित शहा :


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भाजप अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्लू झाला आहे. यासंदर्भातील माहिती स्वत: अमित शहा यांनी याबद्दल माहिती दिली. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहे. स्वाईन फ्लूमुळे अमित शाह दोन ते तीन दिवस हॉस्पीटलमध्ये असल्याचेही वृत्त आहे. केवळ अमित शहाचं नाही तर भाजपचे अनेक वरिष्ठ नेता आजारी आहेत. ज्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 


केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद : 



भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय कायदे मंत्री रवी शंकर प्रसाद यांना सोमवारी एम्स हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले. त्यानंतर त्यांना आयसीयू मधून खासगी वॉर्डमध्ये भरती करण्यात आले. पण त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधार झाला आणि त्यांना दुसऱ्या वार्डमध्ये ठेवलं गेलं.


केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी :



 केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांची तब्येतही फारशी ठिक नाही आहे. गेल्या महिन्यात एका कार्यक्रमात ते बेशुद्ध होऊन पडले. त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याचे निदान नंतर करण्यात आले. हे काही पहिल्यांदाच झाले नाही. याआधी देखील दिल्लीमधील संसद मार्च दरम्यान ते बेशुद्ध पडले होते. 


परराष्ट्र मंत्री सुष्मा स्वराज :



 परराष्ट्र मंत्री सुष्मा स्वराज गेल्यावर्षी किडनीच्या आजारांनी त्रस्त होत्या. ज्यानंतर त्यांचे किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आले. सध्या त्यांचे स्वास्थ्य ठिक आहे. पण तब्ब्येतीच्या कारणामुळे त्या 2019 ची निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 


मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर : 



 गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर कॅंसरशी लढा देत आहेत. त्यांनी अमेरिकेत सर्वात आधी इलाज केला होता. त्यानंतर दिल्लीतील एम्समध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.  दरम्यान त्यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले. पण ते आपल्या कामावर पुन्हा रुजू झाले. 


केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली : 



गेल्यावर्षी अरूण जेटली यांची तब्ब्येत देखील बिघडली होती. ज्यानंतर 2018 मध्ये त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. तिथे ते डायलेसिसवर होते. त्यानंतर अरुण जेटली यांचे 14 मे 2018 ला किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आले. गेल्या नऊ महिन्यांपासून त्यांनी कोणताही परदेश दौरा केला नाही. सध्या अरुण जेटली हे अमेरिकेत उपचार घेत आहेत.