मतदान यंत्रात छेडछाड करून भाजपने मिळवला विजय: मायावती
उत्तर परदेशात नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये भाजप नंतर बहुजन समाजवादी पक्ष क्रमांक दोन वर आला आहे.
नवी दिल्ली : उत्तर परदेशात नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये भाजप नंतर बहुजन समाजवादी पक्ष क्रमांक दोन वर आला. दरम्यान, भाजपला मिळालेल्या विजयावर जोरदार टीकास्त्र सोडत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये (EVM)छेडछाड झाल्याचा आरोप केला आहे.
...तर 2019मध्ये बसपा भाजपचा धुव्वा उडवेल...
2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीतही मायावतींनी EVM मशीनमध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला होता. भाजपच्या यशाबाबत प्रसारमाध्यमांनी मायावती यांनी विचारले असता, 2019मध्ये होणाऱ्या निवडणुकीत जर बॅलेट पेपर द्वारे मतदान घेतले तर, बसपा हा भाजपचा पूर्ण परावभ करेल असेही मायावती म्हणाल्या.
..त्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घ्या
मायावती यांनी पत्रकारांशी शनिवारी संवाद साधला. या वेळी बोलताना त्या म्हणाल्या, 'जर भाजप प्रामाणिक आहे आणि लोकशाहीवर विश्वास ठेवते तर, त्यांच्या सरकारने EVM मशीन बंद करावेत आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान घ्यावे. 2019ला सार्वत्रीक निवडणुका होत आहेत. जर भाजपला आजूनही विश्वास वाटतो आहे की, लोक त्यांच्या सोबत आहेत. तर, त्यांनी 2019च्या निवडणुकीत बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घ्याव्यात. मी खात्री देऊन सांगते की, असे झाले तर, उत्तर प्रदेशात भाजप विजयी होऊ शकणार नाही', असेही मायावती म्हणाल्या.
व्होटबँकेच्या राजकारणामुळे बसपाला फटका
दरम्यान, मायावती यांच्या बसपाला उत्तर प्रदेशमध्ये या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागला. या पराभवापासून मायावती EVMमध्ये छेडछाड होत असल्याबाबत आरोप करत आल्या आहेत. तर, मायावती यांच्या आरोपाला प्रत्युत्त देताना उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी म्हटले आहे की, व्होटबॅंकेचे राजकारण केल्यामुळेच या पक्षाला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे. तसेच, दोष EVM मशिनमध्ये नव्हे तर, विरोध करत असलेल्या लोकांच्या डोक्यात असल्याचेही शर्मा यांनी सांगीतले.