जहानाबादमध्ये भाजप `बाद` तर भभुआमध्ये काँग्रेसचा `धुव्वा`
बिहारमध्ये अररिया लोकसभा, जहानाबाद लोकसभा आणि भभुआ विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालात जेडीयू-भाजप युतीला मोठा फटका बसला.
लखनऊ : बिहारमध्ये अररिया लोकसभा, जहानाबाद लोकसभा आणि भभुआ विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालात जेडीयू-भाजप युतीला मोठा फटका बसला.
जहानाबाद विधानसभा पोटनिवडणुकीत आरजेडीचा विजय झाला. अररिया लोकसभा सीटवर देखील आरजेडीचा विजय निश्चित मानला जातोय.
जहानाबाद विधानसभा निवडणुकीत आरजेडीच्या कुमार कृष्ण मोहन यांनी भाजपच्या अभीराम शर्मा यांचा 35036 मतांनी पराभव केला.
बिहारच्या राजकारणात लालू आणि नितीश यांच्यात ही सरळ लढत होती. आरजेडीसाठी हा मोठा विजय आहे. भभुआ विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपला यश मिळालं आहे. रिंकी राणी पांडे यांनी काँग्रेसच्या शंभू सिंह पटेल यांचा 15 हजाराहून अधिक मतांनी पराभव केला. भभुआ सीटवर भाजपचे आमदार आनंदभूषण पांडे यांचं निधन झाल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली होती.