नवी दिल्ली :  गुजरातमधील बनासकांठा येथील रॅलीत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी भाजपवर जोरदा हल्लाबोल केला. भाजपच्या विकास उपक्रमाची खिल्ली उडवत एखादा पिक्चर फ्लॉप होतो त्याचप्रमाणे भाजपचा विकास प्लॉप झाला असल्याची खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे.


'मोदींनी गुजरातचा विकास या मुद्द्यावर बोलायला हवे'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॅलीदरम्यान, राहुल गांधी म्हणाले, गुजरात निवडणूक आहे तर, मोदींनी गुजरातच्या विकासाचा मुद्दा घेऊऩ बोलायला पाहिजे. मोदींजवळ जवळपास देशातील प्रत्येक राज्याची सत्ता आहे. पण, आमच्याकडे गुजरातमधील वास्तव आहे. ही निवडणूक ही केवळ राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यातील नाही तर, गुजरातच्या जनतेचे भविष्य आहे. पंतप्रधान मोदींनी उद्योगपतींसाठी बरेच काही केले. पण,त्यांना गुजरातच्या विकासबद्ल मात्र काही करता आले नाही.


भाजप कॉंग्रेसमध्ये काट्याची टक्कर


गुजरात विधानसभा निवडणुक मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. प्रत्यक्ष मतदानाला काहीच दिवसांचा अवधी बाकी असून, प्रचार संपण्यासाठी काऊंटडाऊन सुरू आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी प्रचारात गती घेतली आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. मात्र, गुजरातमध्ये सध्या कॉंग्रेस आणि भाजप यांच्यातच काट्याची टक्कर पहायला मिळत आहे. गेली काही वर्षे सत्तेत असलेल्या भाजपसमोर कॉंग्रेसने जोरदार आव्हान उभे केले आहे.


दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग


दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 2 टप्प्यांत मतदान होत आहे. त्यापैकी मतदानाचा पहिला टप्पा 9 डिसेंबरला पार पडला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 14 डिसेंबरला मतदान होत आहे. मतमोजनी 18 डिसेंबरला मतमोजनी होणार आहे.