छोटीशी टेस्ट, ५ मिनिटात घरच्या घरी, यानंतर समजेल तुमच्या शरीरात लसनंतर अँन्टीबॉडीज किती?
हे फ्यूजन प्रोटीन रक्ताच्या थेंबाद्वारे त्वरित अँन्टीबॉडीज आहेत की, नाहीत हे शोधून काढतात.
मुंबई : लस घेतल्यानंतर तुमच्या शरिरात अँन्टीबॉडीज तयार झाल्या आहेत की, नाही हे शोधण्यासाठी आता नवीन मार्ग समोर आला आहे. यामध्ये रक्ताची चाचणी घेण्यात येत आहे, ज्यामध्ये अँन्टीबॉडीजच्या प्रमाणाबद्दल अचूक माहिती दिली जाईल. यासाठी तुम्हाला फार काही करायची आवशकता नाही. फक्त बोटाला हलके टोचुन घ्या आणि चाचणी कार्डवर दोन थेंब रक्ताचे टाका. या चाचणी कार्डचा शोध नुकताच वैज्ञानिकांनी लावला ज्यामध्ये फ्यूजन प्रोटीन मिसळले जातात.
हे फ्यूजन प्रोटीन रक्ताच्या थेंबाद्वारे त्वरित अँन्टीबॉडीज आहेत की, नाहीत हे शोधून काढतात. खरेतर या अँन्टीबॉडीजचे फारच लहान कण आहेत जे वायरल इनफेक्श शोधल्यानंतर तयार होतात. अँटीबॉडीचे प्रोटीन हे व्हायरसविरूद्ध लढण्यासाठी तयार असतात.
या टेस्टचा निकाल 5 मिनिटांपेक्षा कमी वेळात मिळतो. आपण घरी सहजपणे तो चेक करू शकता. या चाचणीवरून तुम्ही कोरोना लस घेतली असेल, तर ती किती प्रभावी आहे हे कळते आणि त्यापासून शरीरात किती अँटीबॉडी तयार झाल्या आहेत हे समजते. हे टेस्ट कार्ड अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने तयार केले आहे. ही टेस्ट अशा लोकांद्वारे देखील केली जाऊ शकते, ज्यांनी लस घेतली नाही. परंतु त्यांना यापूर्वी कोरोनासंसर्ग झाला होता.
यावरून हे कळेल की, कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी शरीरात त्यांच्या किती अँटीबॉडी तयार होत आहेत. एलिसा चाचणीद्वारे देखील अँटीबॉडीज शोधले जातात परंतु त्याचा रिझल्ट यायला कित्येक तास लागतो. तर या कार्ड चाचणीचा रिझल्ट 5 मिनिटात येतो. जर अँटीबॉडीजचे प्रमाण कमी होत असेल तर ते बूस्टर डोस घेऊ शकतात.
असेही काही लोकं असू शकतात, ज्यांना लसीचा काही परिणाम होत नाही. अशा लोकांना एंटीबॉडी चाचणी करणे आवश्यक आहे. जेणेकरुन अँटीबॉडीज त्यांच्या शरीरात कार्यरत आहे की, नाही हे त्यांना समजू शकेल.
वैद्यकीय तज्ज्ञांचे असे मत आहे की, अँटीबॉडी चाचण्या करणे फार महत्वाचे नाही आणि अशा अँटीबॉडी चाचण्या विश्वसनीय नसतात. अँटीबॉडी चाचण्या केल्याने हे कळू शकेल की, यापूर्वी कोणत्याही व्यकितीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असेल, तर त्याचा शरीरावर किती प्रभाव पडतो.
त्यामुळे मग असे होऊ शकते की, कोरोना विषाणुपासून वाचण्यासाठी अँटीबॉडीज चाचणीमध्ये आढळले, तर लोकं ही कोरोना लस घेणार नाहीत. ज्यामुळे ही परिस्थिती भविष्यात धोकादायक ठरू शकते.
असे म्हणू शकत नाही की, शरीरातील अँटीबॉडीचे प्रमाण कळल्यानंतर प्रतिकारशक्तीची हमी आहे. कारण शरीरात असे बरेच घटक आहेत जे अँटीबॉडीसारखे संरक्षण देतात. शरीरात बर्याच नैसर्गिक प्रतिकारशक्ती आहेत जे आजारपणात काम करतात. बी पेशी आणि टी पेशी या यादीमध्ये येतात. जेव्हा जेव्हा शरीरात विषाणू किंवा बॅक्टेरियाचा संसर्ग होतो, तेव्हा त्या विरूद्ध लढायला बी पेशी आणि टी पेशी एकत्र काम करतात.