Blue Aadhar Card: आधार कार्ड हे आपल्या देशातील महत्वाचे दस्तावेज आहे. प्रत्येक कामात आधार कार्ड विचारले जाते. त्यामुळे प्रत्येकजण स्वत:जवळ आधार कार्ड बाळगतो. वयाने मोठ्या व्यक्तीच नव्हे तर लहान मुलांसाठीदेखील आधार कार्ड महत्वाचे आहे. मुलांच्या शाळेतील प्रवेशासाठी तुम्हाला आधार कार्डची गरज लागणार आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही आधार कार्ड बनवले नसेल तर जास्त वेळ दवडू नका. नंतर अचानक घाई करण्यापेक्षा आताच आधार कार्ड बनवून घ्या. पुढे देण्यात आलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही तुमच्या बाळाचे आधार कार्ड बनवू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहान मुलांना काय गरज आहे आधार कार्डची? असं तुम्हाला अजूनही वाटत असेल तर आधी त्याचे महत्व जाणून घ्या. निळे आधार कार्ज 2018 पासून सुरु झाले आहे. हे आधार कार्ड पाच वर्षांच्या मुलांसाठी वैध असते. मोठ्या व्यक्तींप्रमाणे लहान मुलांचे बोटाचे ठसे यात घेतले जात नाहीत. त्यांना बायोमेट्रिक नसते. तुमचे बाळ 5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही त्याच्यासाठी निळ्या आधार कार्डसाठी अर्ज करु शकता. निळे आधार कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.


कोणती कागदपत्रे?


लहान मुलांसाठी निळे आधार कार्ड काढायचे असेल तर नावनोंदणीसाठी आवश्यक आहे. यासाठी कागदपत्रे कोणती ते जाणून घेऊया. यावेळी तुम्हाला मुलाचे जन्म प्रमाणपत्र किंवा हॉस्पिटल डिस्चार्ज स्लिप सबमिट करावी लागेल. मुलं शाळेत जात असतील तर शाळेचे ओळखपत्र देखील पुरावा म्हणून तुम्ही सादर करु शकता. 


मुलांची माहिती त्यांच्या पालकांच्या UID शी जोडलेल्या चेहऱ्याच्य फोटोच्या आधारे प्रसिद्ध केली जाते. असे असले तरी जेव्हा मूल 15 वर्षांचे होते तेव्हा त्याला किंवा तिला त्यांच्या दहा बोटांचा, बुबुळ स्कॅन आणि फेस आयडी असा बायोमेट्रिक डेटा अपडेट करणे आवश्यक असते.


तुमच्या बाळाचे निळे आधार कार्ड बनवण्यासाठी जवळच्या नावनोंदणी केंद्रावरच अपॉइंटमेंट बुक करा.बुक केलेल्या तारखेच्या दिवशी मुलासह आधार नोंदणी केंद्रावर जा. यावेळी पालकांचे आधार कार्ड, तुमचा पत्ता पुरावा आणि मुलाचे जन्म प्रमाणपत्र यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे सोबत नेण्यास विसरू नका. 


कसा कराल अर्ज?


UIDAI वेबसाइट uidai.gov.in वर जा. 
आधार कार्डचा पर्याय निवडा.
मुलाचे नाव, त्याच्या पालकांचा/पालकांचा फोन नंबर भरा. इतर आवश्यक माहिती भरा.
ब्लू आधार कार्ड नोंदणीसाठी अपॉइंटमेंट स्लॉट निवडा.
यानंतर निवडलेल्या जवळच्या केंद्रावर जा.
मुलाच्या UID शी लिंक करण्यासाठी तुमचे आधार कार्ड तपशील द्या. 
येथे मुलाचा फोटो द्या. येथे तुमच्याकडे बायोमेट्रिक डेटा मागितला जाणार नाही.
मुलाचा फोटो काढला जाईल. यानंतर कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया सुरू होईल. 


आता तुमची निळ्या आधार कार्डची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक मेसेज येईल.


60 दिवसांच्या आत तुमच्या मुलाच्या नावाचे निळे आधार कार्ड जारी झालेले असेल.