BMC Job: मुंबई पालिकेत चांगल्या पगाराच्या नोकरीची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. मुंबई पालिकेत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये उमेदवारांना त्यांच्या पदानुसार 16 हजार ते 81 हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे. मुंबई पालिकेअंतर्गत ह्युमन रिसॉर्स कॉर्डिनेटर म्हणजेच एचआर कॉर्डिनेटर तसेच एक्स रे असिस्टंट पदाची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत उमेदवारांना मुंबई पालिकेत नोकरी करता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक्स रे असिस्टंटची एकूण 5 पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून विज्ञान शाखेकतून बारावी उत्तीर्ण किंवा बारावी एमसीव्हीसी असणे आवश्यक आहे. रेडीओग्राफी डिप्लोमा उत्तीर्ण असलेल्या, एक्स रे  विषयातील बी.पी.एम.टी हा तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच उमेदवाराला संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. एक्स रे असिस्टंट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 16 हजार रुपये पगार दिला जाणार आहे. 


उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाइन माध्यमातून पाठवता येणार आहेत. उमेदवारांनी आपले अर्ज वैद्यकीय अधीक्षक, क्षयरोग रुग्णालय समूह, जेरबाई वाडिया रोड, शिवडी, मुंबई-400015 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. 28 मार्च ही अर्जाची शेवटची तारीख आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास, दिलेल्या मुदतीनंतर आलेला अर्ज बाद करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्या.


एचआर कॉर्डिनेटर भरती 


मुंबई पालिकेत एचआर कॉर्डिनेटर पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. उमेदवारांकडे एचआर संदर्भातील डिप्लोमा, डिग्री असावी. एचआर प्रोसेस, पॉलिसी, प्रॅक्टीसचा अनुभव असावा. उमेदवाराचे कम्युनिकेशन, मॅनेजमेंट स्किल उत्तम असावे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना अनुभवानुसार दरमहा 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपयापर्यंत पगार दिला जाणार आहे.


मुंबई पालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा