गुडगाव : रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एक भयानक घटना समोर आली आहे. भोंडसी येथील रायन इंटरनॅशनलच्या टॉयलेटमध्ये दूसरीत शिकणाऱ्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार मुलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मृतदेहाजवळून चाकूही हस्तगत करण्यात आला आहे. 




प्रद्युम्न असे या ७ वर्षाच्या मुलाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून अधिक चौकशी केली जात आहे. हा खून की आत्महत्या या दोन्हीची पोलीस पडताळणी करीत आहेत. ७ वर्षाचा मुला चाकूने आत्महत्या करणार नाही असे जाणकारांचे मत आहे. मुलगा शाळेत पोहोचल्यानंतर १० मिनिटांनी ही घटना घडली.   मुलगा शौचालय मध्ये मृतावस्थेत असल्याचा पालकांना फोन करण्यात आला.