मुंबई : कोरोनाकाळात वाढत्या रुग्ण वाढीमुळे ऑक्सिजनचा साठा कमी पडू लागला आहे. यासाठी देशातील सर्व स्टील प्लांट्स पुढे आल्या आहेत. स्टील प्लांटमधूनच आता देशभर ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. देशात सर्वात जास्त पूरवला जाणार ऑक्सिजन हा  बोकारो सेल आणि भिलाई येथून मिळत आहे. बोकारो सेलमध्ये काम करणारे कामगार आणि अधिकारी दिवसरात्र या प्लांटमध्ये काम करत आहेत. येथून दररोज 150 टन ऑक्सिजन तयार होत आहे. मध्यप्रदेश ते यूपीपर्यंत बोकारो सेलमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. कामगार स्वत:ची चिंता सोडून लोकांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.


जेवणाची चिंता नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोकारो सेलमध्ये ऑक्सिजन तयार करण्यासाठी दोन प्लांट्स आहेत. दोन्ही प्लांट्समध्ये सध्या तीन शिफ्टमध्ये कर्मचारी काम करत आहेत. एक शिफ्ट आठ तासांची असते. कर्मचारी आठ तासांच्या शिफ्टमध्ये नॉन-स्टॉपवर काम करत असतात. या आठ तासाच्या शिफ्टमध्ये हे कर्मचारी आपले जेवण देखील करत नाहीत. जर कोणी त्यांना त्याच्या जेवणाची आठवण करुन दिली तर ते, आपल्याकडे बरेच काम असल्याचे सांगतात.


वेळ का वाया घालवावा?


माध्यमांशी बोलताना एका कर्मचार्‍याने सांगितले की, कोरोना रूग्णांचे प्राण वाचवण्यासाठी आमचे हे छोटेसे योगदान आहे. अशा परिस्थितीत आपण वेळ का वाया घालवावा? आम्हाला सध्या लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. काम पूर्ण झाल्यानंतरच आम्ही आमचे जेवण करतो.


लिक्विड ऑक्सिजनवर भर


सेलच्या आयनॉक्स बोकारो प्लांटमध्ये लिक्विड ऑक्सिजन तयार केला जात आहे. यंत्र रात्रंदिवस काम करत असते. कर्मचार्‍यांना काळजी लागूण असते की, ऑक्सिजन एक्सप्रेस ऑक्सिजन भरण्यासाठी येत आहे. त्याला ऑक्सिजन पुरवायचा आहे. बोकारो सेलमध्ये 25 अधिकारी आणि 145 कामगार दिवसरात्र काम करत आहेत. येथे दररोज 150 टन ऑक्सिजन तयार होत आहे.


यूपीला जास्तीत जास्त पुरवठा


बोकारो सेलच्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात ऑक्सिजनचा सर्वात मोठा पुरवठा उत्तर प्रदेशात झाला आहे. बोकारोमधून उत्तर प्रदेशला 456 मेट्रिक टन, झारखंडला 308 मेट्रिक टन, बिहारला 374 मेट्रिक टन, पश्चिम बंगालला 19 मेट्रिक टन, पंजाबला 44 मेट्रिक टन आणि मध्यप्रदेशला 16 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा केला आहे.