उत्तराखंड : महाराष्ट्रातील भाविक यात्रेसाठी जात असताना त्यांच्यावर घालानं घाला घातला. यात्रेला जात असताना मृत्यूनं रस्त्यात गाठलं. उत्तराखंडमध्ये यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भीषण अपघातानंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये तिन्ही भाविक महाराष्ट्रातील असल्याचं समोर आलं आहे. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. 


महाराष्ट्रातील 12 भाविकांना घेऊन गुरुवारी बोलेरो कार निघाली.  या कारला भीषण अपघात झाला. यमुनोत्री धाममधून 28 किमी दूर अंतरावर ओजरीजवळ पोहोचले. यावेळी बसला साइड देण्याच्या नादात नियंत्रण सुटलं आणि बोलेरो दरीत कोसळली. 


या अपघातात महाराष्ट्रातील तीन भाविकांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तिथे रेस्क्यू ऑपरेशन करून जखमींना बाहेर काढण्यात आलं. या अपघातात कारचा चुराडा झाला आहे.