भारतावरून जाणाऱ्या विमानाला बॉम्बस्फोटाची धमकी मिळताच IAF चं सुखोई हवेत झेपावलं; थरारक Video पाहाच
Bomb threat Onboard : या क्षणाची मोठी बातमी... विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीनं एकच खळबळ... ते क्षण हादरवून टाकणारे
Bomb threat Onboard : भारताच्या हवाई हद्दीतून (India) जाणाऱ्या इराणी विमानाला बॉम्बस्फोटाची धमकी आल्याने भारतीय वायुदलाची सुखोई 30 एमके आय ही विमानं हवेत झेपावली. तेहरानकडून ग्वांगझाऊकडे निघालेल्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. पण, हे विमान दिल्लीत उतरवण्याची परवानगी नाकारण्यात आली.
भारताची सुखोई विमानं तातडीने पंजाब आणि जोधपूर बेसवरून आकाशात झेपावली. या विमानात तातडीने अंतर्गत सुरक्षा तपासणी करण्यात आली, त्यानंतर हे विमान चीनकडे रवाना झालं. मात्र भारतीय हद्दीतून बाहेर पडेपर्यंत या इराणी विमानासह सुखोई हवेत असणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. (Bomb threat Onboard triggers alert Iranian passenger jet over Indian airspace IAF jets scrambled)
भारताकडून नजर ठेवली जात असतानाच हे विमान चीनमध्ये दाखल झालं. दरम्यान विमान भारतीय हद्दीतून जात असतानाच ही धमकी मिळाली. लाहोर एटीसीनं विमानात बॉम्ब असल्याची माहिती दिली.
महान एअरलाईन्सच्या या विमानात बॉम्ब असल्याची कोणतीही अधिकृत माहिती मात्र अद्यापही समोर आलेली नाही. किंबहुना आतापर्यंत हे विमान भारतीय हवाई हद्द ओलांडून गेलं आहे.