हतबल मुकेश अंबानी, इच्छा असूनही करू शकत नाहीत ही 4 कामं
रिलायन्स कम्युनिकेशनच्या बिघडलेल्या परिस्थितीमुळे मुकेश अंबानी हतबल झाले आहेत.
मुंबई : रिलायन्स कम्युनिकेशनच्या बिघडलेल्या परिस्थितीमुळे मुकेश अंबानी हतबल झाले आहेत.
आता इच्छा असूनही मुकेश अंबानी आपला लहान भाऊ अनिल अंबानीची मदत करू शकत नाहीत. अनिल अंबानीला मोठा फटका बसला आहे असं असलं तरीही श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी त्यांना मदत करू शकत नाहीत. याचं महत्वाच कारण ठरलं आहे रिलायन्स कम्युनिकेशन म्हणजे आरकॉमच्या विरूद्ध मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेला हा सर्वात मोठा निर्णय. कोर्टाच्या परवानगी शिवाय आर कॉम कोणतीच प्रॉपर्टी विकू शकत नाही. आर कॉमवर भरपूर मोठं कर्ज आहे. आणि त्यातून वर येण्यासाठी मुकेश अंबानीने जिओला आपलं एसेट विकण्यासाठी मोठी डील केली होती.
आरकॉमवर 45 हजार करोड रुपयांचे कर्ज
रिलायन्स कम्युनिकेशनवर 45 हजार करोड रुपयांचे कर्ज आहे. कर्ज परत करण्यासाठी अनिल अंबानी यांनी 2017 मध्ये एक प्लान सादर केला होता. यावेळी मुकेश अंबानी एक मोठा भाऊ म्हणून मदतीसाठी धावून आले होते.
जिओसोबत झाली होती डील
अनिल अंबानी यांनी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओसोबत हजार करोड रुपयांच्या डीलची घोषणा केली होती. ज्यामध्ये आरकॉमची अॅसेट असलेल्या जिओला विकण्याचा प्रस्ताव होता. मात्र कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे या दोघांमध्ये झालेल्या डीलला देखील फटका बसला आहे. डील न झाल्यामुळे मुकेश अंबानी अनिल अंबानी यांची मदत करू शकत नाही.
आता डील होणार नाही
आरकॉमची याचिका फेटाळल्यानंतर मुकेश अंबानी यांच्या जिओ आणि आरकॉममध्ये आता डील होणार नाही.
आर्बिट्रेशन कोर्टाने दिली स्थगिती
स्वीडनची कंपनी इरिक्सने आरकॉमोबत नेटवर्क ऑपरेशनकरता 7 वर्षाचा करार केला होता. आरकॉमच्या विरोधात 2017 मध्ये इनसॉल्वेंसी पिटीशिअन दाखल केली होती. कोर्टाच्या परवानगी शिवाय कोणतंच काम या दोन कंपनीत होणार नसल्याच म्हटलं आहे.