नवी दिल्ली : डिजिटल तिकिट बुकिंग करण्यामध्ये १२ टक्के वाढ झाली आहे. आता 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आता प्रवाशी भीम अॅपद्वारे आपलं तिकिट बुकिंग करू शकतात. रेल्वे बोर्डाचे सदस्य मोहम्मद जमशेद यांनी सांगितले की, शुक्रवारपासून भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजे भीम अॅपचा वापर करून तिकिट काढू शकतात. तसेच त्यांनी सांगितले की, नोटबंदीच्या अगोदर जवळपास ५८ टक्के आरक्षित तिकीट ऑनलाईन बुकिंग होत होती. ऑक्टोबर २०१६ च्यानंतर ही संख्या ७० टक्के वाढली आहे. 


त्यांनी सांगितले की आरक्षित तिकिटात जवळपास तीन ते ५ करोड प्रवासी ई-तिकिटच्या माध्यमातून डिजिटल व्यवहाराकडे वळत आहे. काऊंटवर जवळपास ३० टक्के प्रवाशी आरक्षित तिकिट काढतात. त्याचप्रमाणे डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वाइपिंग मशीन देखील ठेवण्यात आली आहे. 


काय आहे भीम अॅपद्वारे व्यवस्था 


जमशेद यांनी सांगितले की, कार्ड किंवा कॅश घेऊन न फिरणाऱ्या प्रवाशांची देखील रेल्वे मदत करू इच्छिते. यासाठी आम्ही १ डिसेंबरपासून यूपीआयची शुरूवात करत आहे. प्रवाशी आपल्या मोबाईल फोनसोबत काऊंटवर जाऊ शकतात. आणि आपल्या तिकिटाचे रिझर्वेशन करू शकतात. आता १ डिसेंबर २०१७ पासून म्हणजे आजपासून 'भीम' अॅपद्वारे तिकिट बुक करू शकता.