अमृतसर : पंजाबमधील ( Punjab) अमृतसरमधून (Amritsar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  एका बीएसएफ (Border Security Force) जवानाने कॅम्पच्या आत आपल्याच सहकारी जवानांवर गोळीबार केला, ज्यामध्ये 5 जवान शहीद झाले आहेत, तर 12 जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीएसएफच्या जवानाने अमृतसरमधील खासा बीएसएफ कॅम्पमध्ये साथीदारांवर अंदाधुंद गोळीबार केला. फायरिंग करणाऱ्या जवानाचं नाव कॅप्टन सतप्पा (Ct Satteppa) असं असून या गोळीबारातस्वत:ही जखमी झाला असून त्याला उपचारासाठी गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


एसएफ जवानाने केलेल्या गोळीबारामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. या घटनेनंतर बीएसएफने प्रेस रिलीज जारी केली आहे. याप्रकरणी तपासासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.