मुंबई : स्वप्न माणसाला जगायला शिकवतात. हे जगणं साधं सुधं नसतं यामध्ये असतो संघर्ष, परिश्रम.... असंच एका तरूण मुलाचं जगणं सोशल मीडियावर व्हायरल झालंय. सुमारे १२ च्या सुमारास हा तरूण मुलगा सुमसाम रस्त्यावर धावतोय. त्याच्या स्वप्नासाठी... त्याच्या खऱ्या अस्तित्वासाठी.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९ वर्षीय प्रदीप मेहरा दिल्लीच्या नोएडा परिसरात मध्यरात्री १२ च्या सुमारास धावत होता. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेता विनोद कापरी यांनी या मुलाचा व्हिडीओ तयार केला. या दरम्यान ते त्या मुलाशी चौकशी करत असतात. 


'मुलाला घरी सोडतो', असं विचारल्यावर तो मुलगा त्यांना नाकार देतो आणि आपण भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी धावण्याचा सराव करत आहे आणि मी गाडीत आलो तर माझा रोजचा दिनक्रम चुकेल.



धावण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही असंही तो मुलगा त्यांना बोलताना आपल्याला दिसत आहे. तो नोएडाच्या सेक्टर १६ येथे मॅक्डोनल्ड रेस्टॉरन्टमध्ये काम करत असल्याचं सांगतो. 


आता घरी जावून आपण आपलं जेवण बनवणार आणि मग तो जेवणार. ... प्रदीप मेहरा या १९ वर्षीय मुलाचा हा रोजचा दिनक्रम आहे. 


मी काही चुकीचं वागतोय... 


हा व्हीडिओ चित्रीत करताना विनोद कापरी यांनी मी तुझा व्हीडिओ सोशल मीडियावर टाकल्यास तो व्हायरल होईल, असे प्रदीपला सांगितले.


त्यावर प्रदीप म्हणाला की, मी कशाला व्हायरल होईन, मला कोणीही ओळखत नाही. पण व्हीडिओ व्हायरल झाला तरी ठीक आहे. मी काही चुकीचं थोडंच वागतोय, असे प्रदीपने म्हटले.