मुंबई : जेव्हा कोणासोबत वाईट घडतं तेव्हा तो व्यक्ती विचार करु लागतो की, माझ्यासोबतच असं का घडतं? आणि तो आपल्या नशीबाला दोष देऊ लागतं. परंतु नशीब कधीकधी अशा काही गोष्टी घडवून आणतो की, ज्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण होऊन बसतं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला एखाद्याचं नशीब इतकं चांगलं असेल याच्यावर विश्वास देखील बसणार आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर देव या जगात आहे, या गोष्टीवर देखील तुम्ही विश्वास करु लागला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, एक मूल छतावरून पडतं, परंतु त्यावेळेला तेथे दुसरा मुलगा येतो. ज्यामुळे त्या मुलाचे प्राण वाचतात. हा व्हिडीओ पाहिल्यावर बहुतेक लोकांच्या तोंडातून शब्द निघेल की, 'देवा तुझी लीला अपरंपार आहे.' आणि ते खरं देखील आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर एक लहान मुलगा रस्त्यावरुन जात होता. तेव्हा त्याला दिसले की, एका बिल्डिंगच्यावरुन पतंग पडत आहे. ज्यामुळे तो तेथे पतंग खाली पडेपर्यंत वाट पाहातो आणि जेव्हा पतंग खाली पडतो, तेव्हा तो उचलण्यासाठी हा लहान मुलगा खाली वाकतो. परंतु तेवढ्यात त्याच्यावर एक दुसरा लहान मुलगा पडतो.


वरुन पडणाऱ्या मुलाचं नशीब इतकं चांगलं होतं की, बरोबर त्याच वेळेला हा दुसरा लहान मुलगा पतंग उचलण्यासाठी खाली वाकला. ज्यामुळे तो डायरेक्ट खाली न पडता त्या मुलावर पडला. जर असं झालं नसतं तर हा वरुन पडणारा मुलगा सरळ जमिनीवर पडला असता. ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली असती किंवा त्याचे प्राण देखील गेले असते.


18 सेकंदांचा हा व्हिडीओ  40 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. जो लोकांच्या अंगावर काटा आणणारा आहे.



@Rajneeshht नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'खूपच अप्रतिम दृश्य! छतावरून पडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी देवाने पतंग लुटण्याच्या बहाण्याने दुसऱ्या मुलाला पाठवले! देवाच्या इच्छेविरुद्ध काहीही शक्य नाही!'


हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.