Boy Girl kiss  : आताची सर्वात मोठी बातमी...देशात रॅगिंगवर (Raging) बंदी असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रॅगिंगच्या नावाखाली एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने किस करण्यात आलं आहे. एवढंच अनेक कॉलेजमधील अनेक मुला-मुलींसमोर हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी  5 विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 


व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका मुलीला खाली बसविण्यात आलं आहे. तिच्या आजूबाजूला घोळका करुन अनेक विद्यार्थी आहेत. एक विद्यार्थी खुर्चीवर बसला आहे आणि त्याचा हातात काठी दिसतं आहे. व्हिडीओमध्ये पुढे तो मुलाला कानाखाली मारतो आणि मुलीला किस करायला सांगतो. तो मुलगा घाबरुन मुलीच्या गालावर किस करतो. त्यानंतर मुलगी उठून निघायला लागते. त्यानंतर वरिष्ठ विद्यार्थी तिचा हात पकडतो आणि तिला खाली बसवतो. हातात असलेल्या काठीने तुला घाबरवतो. (Boy Girl kiss video viral ragging video Odisha News nmp)



कुठे घडला हा प्रकार


हे प्रकरण गंजम जिल्ह्यातील ओडिशा स्कूल ऑफ मायनिंग इंजिनीअरिंग (Odisha School of Mining Engineering in Keonjhar) इथे घडला आहे. बेरहामपूरचे एसपी सर्बन विवेक एम यांनी सांगितले की, 5 विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध रॅगिंग आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी अभिषेक नाहक हा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. तो 24 वर्षांचा आहे. यातील दोघे अल्पवयीन आहेत.