नवी  दिल्ली: लहान मुलं खूप क्युट असतात असं म्हटलं जातं. मात्र आताच्या पीढी एवढी हुशार आहे की काही विचारायची सोय नाही. सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी क्युट तर कधी रागात तर कधी रडताना किंवा खोड्या काढतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होत असतात. एका लहान मुलाचा चक्क धमकी देतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की शिक्षक ओरडल्यानंतर मुलगा रडण्याचे हावभाव करत आहे. त्याचे हे हावभाव युझर्सचं लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे सर्वजण सुरुवातीला त्याच्या हावभावाचं कौतुक करतात. मात्र नंतर तो मुलगा जे काही करतो ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.


शिक्षकाने मारल्यामुळे हा मुलगा रडत आहे. चिडलेल्या मुलाचा इगो हर्ट झाल्यानं रागात शिक्षकाला चांगलीच धमकी दिली आहे. त्याची ही धमकी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 



या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता लहान मुलगा शेवटची नाकावरून हात फिरवत हात कापण्याची धमकी देतो. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.