बंगळुरु : कर्नाटकातील सिद्धेश्वर भागात पब्जी खेळाच्या वेडापायी मुलानंच वडिलांची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलगा रात्रभर मोबाईलवर पब्जी खेळत असल्यानं वडिलांनी त्याच्या हातातून मोबाईल काढून घेत इंटरनेट बंद केलं. याचा राग अनावर झाल्यानं मुलानं थेट वडिंलाचा खूनच केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऐवढंच नाही तर त्यान वडिलांची निर्दयीपणे हत्या केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलांने आपल्याच वडिलांचे अक्षरश: तुकडे-तुकडे केले. मुलानं कुटुंबीयांतील इतर सदस्यांना एका खोलीत बंद केलं आणि वडिलांचा खून केला. मृत पावलेले वडील पोलीस सेवेतून निवृत्त झाले होते. मुलगा हा मानसिकदृष्ट्या रुग्ण असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. पोलीस याबाबत अधिक चौकशी करत आहेत.


पब्जी गेमचे अनेक दुष्परिणाम सध्या पुढे येत आहेत. याआधी ही पब्जीमुळे अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. पालकांनी देखील मुलांना याबाबत मुलांमध्ये जनजागृती करुन त्यांना योग्य प्रकार यातून बाहेर आणण्याची गरज आहे.