Girlfriend Boyfriend Viral Video : प्रेम आणि प्रेमाची भावना खूप खास असते. ज्याला प्रेम होतं त्यालाच ही भावना समजू शकते. प्रेमाचे प्रत्येक क्षणही खूप खास असतात. त्यातील प्रपोज हे तर अगदी जिव्हाळाचा विषय...प्रत्येकाला वाटत आपल्या आयुष्यातील हा क्षण खूप सुंदर आणि हटके असावा. गर्लफेन्ड असो किंवा बॉयफ्रेन्ड हे एकमेकांसाठी कायम काही तरी सप्रराईज प्लन करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर एक कपलचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये त्या तरुणाने तरुणीला प्रपोज करण्यासाठी भन्नाट आयडिया शोध काढली आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण म्हणतोय ''असं प्रोपोज करशील तर कुणी कसं नाही बोलणार.'' तुम्ही पण हा व्हिडीओ पाहून प्रेमात पडाल. 


कपलचं 'ते' खास क्षण


प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी त्याने जगावेळी कल्पना शोधून काढली आणि त्याचा या आयडीयामध्ये तिच्या मित्रांनी मदत केली. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. महामार्गावर गाड्यांची येजा सुरु आहे. एका बाइकवर एक तरुण आणि तरुणी जात असतात. 


तेवढ्यात एक बाइकस्वार त्यांचा पुढे जातो आणि त्याचा काळा रंगाच्या टीशर्टवर मागे लाल रंगाचं हृदय असतो. त्यानंतर दुसऱ्या बाइकस्वार पुढे जातो आणि त्याचा बाजूने बाइक चालवायला लागतो. त्याचा टीशर्टवर I लिहिलेला असतो. मग दुसऱ्या बाजूने एक अजून बाइकस्वार या दोघांच्या बाजूला येतो. त्याचा टीशर्टवर U लिहिलेला असतो. (Boyfriend propose Girlfriend bike riding couple Viral Video trending today top trends)


काही क्षणात त्यांच्या बाइकच्या बाजूला एक तरुण फुलांचा गुच्छा तिच्या बॉयफ्रेन्डकडे देतो. तरुणी ते पाहून आश्चर्यचकित होते. समोर आय लव्ह यू आणि आता फुलांचा गुच्छा...समोर जाणून ते रस्त्याच्या बाजूला बाइक थांबवतात आणि तो तरुण गुडघ्यावर बसून तरुणीला बुके देऊन प्रपोज करतो. या क्षणाला अजून खास करण्यासाठी त्या तरुणाचे मित्र त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करतात. 


तरुणी या सगळ्याने भारावून जाते आणि भावूक होते. तरुण तिली मिठीत घेतो. प्रपोजचा हा क्षण त्याच्यामधील एक जण आपल्या कॅमेऱ्यात कैद करतो. हा व्हिडीओ सोशल  मीडियावर नेटकऱ्यांना आवडतोय. 


मात्र एकच गोष्टी इथे आवर्जून सांगावीशी वाटते. हे प्रपोज खूप छान आहे. पण महामार्गावर वाहनांची ये जा सुरु असताना असं करणे कितपत्य योग्य आहे? त्यांची एक चूक सगळ्यांचा जीवावर बेतली असती.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामवरून व्हायरल होतो आहे. aee_aaiknand11.11__pm_ या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.