मुंबई : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. नेहमीच हे व्हिडीओ हसवणारे किंवा मग प्राण्यांचे असतील असं नाही. कधी कधी काही व्हिडीओ तर आपल्याला खूप काही शिकवून जातात. सध्या सोशल मीडियावर एक जूना व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ एका कपलचा आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही नक्कीच हसू अनावर होईल. (Viral Video) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षी पावसाळ्यात भारतातील रस्त्यांची अवस्था कशी होते हे आपल्यापैकी कोणालाही सांगायची गरज नाही. कधथी रस्त्यात पाणी तुंबतं तर कधी प्रचंड चिखल होतो.  त्यामुळे रस्त्यात अनेक गाड्या अडकतात तर काही खराब होतात. असाच हा व्हिडीओ आहे. (Trending Video) या व्हिडीओत रस्त्यावर स्कुटी खराब झाल्याचं पाहायला मिळतंय. पावसाच्या पाण्यात घाण होण्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी ही मुलगी स्कुटीवर बसून राहते तर तिचा बॉयफ्रेंड ती स्कुटी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा तोल जातो आणि ती स्कुटी त्याच्या हातून सुटते. अशात स्कुटीवर बसलेली त्याची गर्लफ्रेंड (boyfriend girlfriend ) ही त्या गुडघाभर पाण्यात पडते.  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी त्या मुलीला ट्रोल केले आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'गर्लफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी त्या मुलानं मुद्दामून असं केलं आहे. दुसरा नेटकरी म्हणाला,' मला या पागल मुलीचा राग आला आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, बाबूने धक्का दिला. आणखी एक नेटकरी म्हणाला, पापा की परी नाही ही तर जलपरी आहे, अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. व्हायरल झालेला हा व्हिडीओ 1 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. (boyfriend was taking the girlfriend on a scooter to the flooded road and pushed her)