Dance Viral Video:  सोशल मीडियावर काही व्हिडिओ सर्वांचं लक्ष वेधून घेतात. मुलींच्या डान्सचे व्हिडिओ नेहमी ट्रेंडिंग (Trending Video) असल्याचं दिसून येतं. अनेकदा तुम्ही मुलींना पारंपारिक साडीमध्ये नृत्य करताना पाहिलं असेल. मात्र, तुम्ही मुलांना पारंपारिक साडीमध्ये (Traditional saree) पाहिलंय का? अनेकदा नसेलही... मात्र, याला अपवादात्मक एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओने (Viral Video) इंटरनेटवर धुमाकूळ घातल्याचं दिसतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साडी नेसून नाचणाऱ्या पुरुषांचे अनेक व्हिडिओ (Boys Dance in Saree) इंटरनेटवर व्हायरल झाले असं क्वचित पहायला मिळतं. अशातच सध्या इन्टाग्राम आणि फेसबूकवर तमिलनाडूमधील (Tamil Nadu) शाळकरी मुलाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. केसांवर चमेलीच्या वेण्या आणि दागिन्यांसह पारंपारिक साडी नेसलेल्या मुलांनी सोशल मीडियावर धुमधडाका केलाय.


आणखी वाचा - क्रिकेट सोडून शुभमन गिलला लागला भलताच नाद; अचानक झाला Spider Man; पाहा Video!


तामिळनाडूतील एका शाळेतील तीन मुलांनी पारंपारिक साड्या परिधान केल्या. एवढंच नव्हे तर त्यांनी नृत्यानं सर्वांना प्रभावित केलं आहे. M.P.Dhasvant या इन्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अवन इव्हान चित्रपटातील दिया दिया डोले या गाण्यावर मुलांचा एक गट नाचताना दिसतोय. शाळेच्या मुलांनी देखील शांत राहून डान्सचा अनुभुति घेतली. त्यामुळे मुलांना डान्ससाठी प्रोत्साहन मिळाल्याचं दिसतंय.


पाहा Video


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Seithimalar (@seithimalar)



सोशल मीडियावर हा व्हिडिओ दीड लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर सर्वजण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. या मुली आहेत की मुलं? असा सवाल अनेकांना पडला आहे. तर अनेकांचं याच प्रश्नावरून डोकं चक्रावलं आहे. मुलं आणि मुलीचे कपडे काय असावेत यावर मोठी चर्चा होताना दिसते. सध्या युनीक्लोथ्स (UniCloths) हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात दिसून येतो, त्यामुळे आता येत्या काळात समाजाची मानसिकता बदतेय का? असा प्रश्न देखील विचारला जात आहे.