मुंबई : अवघ्या तीन तासात ग्रीन कॉरिडोरने 1400 किमीचं अंतर पार करून ह्रदय पुण्यावरून दिल्लीला पोहचवण्यात आले. ओखलाच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी 34 वर्षीय महिलेच्या शरीरात ह्रदय प्रत्यारोपण केले.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी 3.30 वाजता फोर्टिस हॉस्पिटलच्या डॉक्टरांची टीम पुण्यावरून रवाना झाली. सायंकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी ही टीम दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर होती. त्यानंतर पोलिसांच्या 18.4 किमी लांब ग्रीन कॉरिडोरच्या मदतीने अवघ्या 21 मिनिटे 20 सेंकदामध्ये ह्रदय हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यात आले. हॉस्पिटलमध्ये पोहचल्यानंतर डॉक्टरांनी यशस्वीरित्या ह्रदय प्रत्यारोपण केले.



'दिल्लीची 34 वर्षीय महिला हार्ट फेलियर होती. पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये एक 47 वर्षीय रुग्ण ब्रेन डेड असल्याचे समजले. त्यांच्या कुटुंबाने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर डॉक्टरांची टीम पुण्याला रवाना झाली, असे स्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर जेएस मेहरवाल यांनी सांगितले.  


'चार दिवसांपू्र्वी प्रकृती अस्वास्थामुळे एक रूग्ण रूग्णालयात दाखल झाला. त्याव्यक्तीला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. या व्यक्तीच्या नातेवाईकांना त्यांच हृदय दान करायचं होतं. आम्ही त्याकरता चौकशी देखील केली मात्र महाराष्ट्रात आम्हाला तशी गरजू व्यक्ती भेटली नाही. पण त्यानंतर दिल्लीतील फोर्टिस रूग्णालयातून फोन आला, अशी माहिती रूबी रूग्णालयाच्या संजय पाठारेंनी दिली.'